आमच्या आऊसाहेबांनी(आई) एक वेगळ्या आणि सोप्या प्रकारची दही चटणी invent केली आहे आणि फार दिवसांपासून माझ्या मनात त्याची रेसिपी माझ्या ब्लॉगवर शेअर करायचा विचार घोळत होता. आज Mothers Day आहे म्हटलं एकदाचं करूच पोस्ट. मी स्वतः खूप वेळा ही चटणी केली आहे आणि मला ताटात एखादी भाजी नसली तर मी ह्या चटणीवर निभावतो.
साहित्य :-
१. १०-१२ हिरव्या मिरच्या(आवडीनुसार नाहीतर परत toilet मधे बसून मला शिव्या दयाल. :P)
२. २-३ हिरवे टोम्याटो.
३. ५-६ पाकळ्या लसुन.
४. १ चमचा जिरे.
५. २ वाटी दही.
६. २ चमचे तीळ.
७. कोथिंबीर.
८. भाजलेले शेंगदाणे.
९. तेल, मीठ, साखर.(हे खास तोलून-मोलून घेणाऱ्या पुणेकरांसाठी.)
कृती :-
१. हिरव्या मिरच्यांचे तुकडे करा(एका मिरचीचे दोन-तीन तुकडे. कढईत थोडं तेल टाकून मंद आचेवर या मिरच्या लालसर होईपर्यंत भाजून घ्या. याच पद्धतीने टोम्याटोही भाजून घ्या.
२. भाजलेल्या मिरच्या आणि टोम्याटोत चवीपुरते मीठ, जिरे, तीळ, शेंगदाणे, लसुन टाकून मिक्सरने बारीक करून घ्या.
३. तयार झालेले मिश्रण दहीमध्ये घालून मिक्स(मिक्स म्हटलं की मिक्सर हो ना पण आता हातानेच मिक्स) करावे. चवीपुरती साखर टाकावी.
४. कढईत तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता व तिळाची फोडणी द्यावी. फोडणी दिलेलं मिश्रण दहीवर घालावे. सजावटीसाठी कोथिम्बिर टाकू शकता. २-४ पुदिन्याची पानं चटणीला अजून टेस्टी करतील.
फ्रीजमध्ये चटणी बराच वेळ राहू शकते. तयार चटणी तुम्ही पोळी(आपल्या भाषेत चपाती), ब्रेड, परोठासोबत सर्व करू शकता.
महिला वर्गासाठी खास टीप : जर एखादी तयार केलेली भाजी हवीतशी झाली नसेल तर त्या शेजारी ताटात ही चटणी सर्व करा म्हणजे सगळं काही आलबेल होईल.

I will try this one for sure!!
ReplyDeleteWow!
ReplyDeleteNice
Great
This comment has been removed by the author.
ReplyDelete