Monday, August 26, 2013

प्रेम तुझं-माझं आणि आपलं


दुसऱ्या दिवशी मंगळागौर असते. हा सण नवविवाहितेने करण्याचा सण असतो. घरात दोन नवविवाहित दाम्पत्य असल्याने यावर्षीची तयारी जरा जोरातच चालू असते. स्वयंपाक आवरून घरातल्या सर्व स्त्रियांचं साडीवर discussion होतं आणि हा घोळका मेहंदी लावायला हॉल मध्ये जमा होतो. जेवण अजून झालेलं नसतं पुरुष मंडळी थोडं उशिराच येतात त्यामुळे सर्व स्त्रियां आपल्या एकाच हाताला मेहंदी लावतात.
विशाखा मात्र आपल्या ननंदेला म्हणते माझ्या दुसऱ्या हाताला पण मेहंदी लावा. हे ऐकून सासूबाई म्हणतात, "अगं विशाखा तुझ्या नवऱ्याला मी वाढेल जेवायला पण तू कशी जेवणार. तुला भूक नाहीये का? ". तेव्हा विशाखा म्हणते, "आत्या, भूक तर आहे पण एकदा का जेवण झालं की नंतर मला कोणीच मेहंदी लावणार नाही. Don't Worry आत्या हे आहेत ना भरवतील मला." आणि सगळेच हसायला लागतात ती पण लाजते आणि मेहंदी लावण्यासाठी आपला दुसरा हात पुढे करते. इतक्यात सासूबाई आपल्या मुलीला म्हणतात, "लाव ग आशु मेहंदी माझ्या पण दुसऱ्या हाताला." आशु म्हणते, "अगं आई मग जेवायला कोण वाढणार सगळ्यांना आणि तुझा पण उपवास आहे तू कशी ग सोडणार उपवास?" सासूबाई विशाखाकडे बघत म्हणतात, "का आमचे हे आहेत ना भरवतील मला." आणि एकच हश्या पिकतो. सासूबाई म्हणतात, "का ग प्रेम काय फक्त तुम्हा तरूणांचच असतं का? आमचं पण प्रेम बघा मग तुम्ही आज." घरातल्या सगळ्या स्त्रिया आपल्या दोन्ही हाताला मेहंदी लावतात.
थोडयाच वेळात पुरुष मंडळी घरी येतात. प्रत्येकजण आपल्या बायकोने दोन्ही हातावर लावलेल्या मेहंदीची प्रशंसा करतात आणि जेवायला कोणीतरी वाढेल म्हणून हॉलमध्ये जमा होतात. १० मिनिटे, 15 मिनिटे शेवटी आवाज येतो. "अगं आज जेवायला देणार आहात की नाही?" इतक्यात सगळे स्त्रियां हॉलमध्ये येऊन काही न बोलता उभे राहतात. बाबा म्हणतात, "अगं असं घुम्यासारखं का उभ्या आहात जेवायला वाढ आम्हला ९:३० वाजले आहेत, पोटात कावळे ओरडत आहेत." तेव्हा सगळ्या स्त्रियां आपले मेहंदीने भरलेले दोन्ही हात पुढे करतात.
थोड्याच वेळापूर्वी ज्या हातांची तारीफ केली आता तेच मेहंदीने भरलेले हात सगळ्या पुरुष मंडळीना पाहून तळपायाची आग मस्तकाला जाते. मग एक आवाज येतो "स्वयंपाक तरी केला आहे की नाही ते तरी सांगा?" दादा म्हणतो एक मित्राची पार्टी होती गेलो असतो तर बरं झालं असतं. इतक्यात आई म्हणते आरे दादा स्वयंपाक केला आहे, आज तुमचं तुम्हीच सर्व करा. तो उठतो आणि किचन मधून एक-एक जेवायच्या वस्तू आणतो. सगळे पुरुष मंडळी वैतागून आपापलं ताट घेऊन जेवायला सुरवात करत असतात तेवढ्यात बाबा म्हणतात,"अगं तुझा उपवास आहे ना आज? दुपारी पण तू काही नाही खाल्लस." आई म्हणते मी काय आमच्यापैकी कोणीच उपवास सोडला नाही. आई झाला प्रकार सर्वाना सांगते आणि सर्व पुरुष मंडळी तो भरलेला ताट आपल्या बायकोला भरवतात. सगळ्यांना जेवताना विशाखाकडे पाहून हसू मात्र काही केल्या आवरत नाही.
तो तिला घास भरवत असतो आणि अचानक ती त्याला प्रेमाने जोरात चावते. तो आईगंSS करतो आणि म्हणतो बावळट आहेस का तू? ती म्हणते मला रोज असं प्रेमाने भरवत जा ना मग. तो म्हणतो अस्स. आता बेडरूम मध्ये चल मग बघ तुला कुठं-कुठं आणि कसं-कसं चावतो ते. आणि आज तुझ्या हाताला मेहंदी असल्याने तुझी माझ्यापासून सुटका पण करू शकणार नाहीस. ती म्हणते मी आज आत्याजवळ झोपणार आहे. हे ऐकून बाबा म्हणतात. 'खबरदार.. आज आम्हाला कोणी disturb केलं तर' आणि सगळ्यांच्या हश्या पिकतात.