Wednesday, February 19, 2014

छत्रपती शिवाजी महाराज... काही विचार


आज शिव-जयंती निम्मित छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकण्यातून, वाचनातून उमजलेले काही विचार लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न.
छत्रपती शिवाजी Vs मुसलमान

छत्रपती शिवाजी Vs मुसलमान हे चित्र निर्माण करण्याचं काम प्रथम इंग्रजांनी केलं त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ होता कारण सबंध भारतवर्षात गोऱ्या सरकारला देशाबाहेर काढण्याची हिम्मत फक्त मराठ्यांमध्ये(आता मराठे म्हणजे फक्त मराठा असा विचार करत असाल तर कृपया इतिहास वाचा जरा. शुद्ध शब्दात सांगायचे म्हणजे मराठी बोलणारे मराठे.) आणि या मराठ्यात एकी झाली तर इंग्रजांच काही खरं नाही. मराठ्यांमध्ये जी उर्जा होती त्याचा मूळ स्रोत शिवराय. गोरयांनी पहिला शिवाजी महाराज हे मुस्लिम द्वेषठे होते असा प्रचार केला आणि नंतर त्यांनी मराठा आणि ब्राह्मण समाजात तेढ निर्माण केला आणि अजूनही तो कायमच आहे. महाराजांनी केलेलं हे कृत्य म्हणजे साधे बंड नव्हते तर ती क्रांती होती. आपल्या शब्दात सांगायचे तर It was revolution. हे दुसरे तिसरे कोणी नाही तर त्याकाळच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने म्हटले होते. "Others in this country are knit together in this country by other causes : they are castes, religious setc, tribes but the Marathas are a nation & from Brahman, Kunabi to Mahar they glory the fact". छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या प्रगतीच्या आड येणारे अडथळे कडून टाकून मार्ग मोकळा केला. त्यांचा उद्देश अफझलखानास मारण्याचा नव्हता, तर प्रगतीच्या मार्गावर आड येणाऱ्या विघ्नाचे निवारण करावयाचा होता. केवळ मुसलमान म्हणून त्याला मारावयाचा हेतू असता तर शिवरायांनी खानाच्या बायकोला दागिने वगेरे देऊन विजापुरास पाठविले नसते. प्रत्येकाने जातीकडे क़िव्हा धर्माकडे न बघता सर्व राष्ट्राकरिता प्रयत्न केला पाहिजे.
लोकमान्य टिळक म्हणाले होते, " छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी एखादा मुसलमान असता तरी त्याचा आम्ही गौरव केला असता." या पुढे जाऊन टिळक असे म्हणतात कि आपण शिवरायांच्या कामगिरीतील प्रेरणा घेतली पाहिजे. या प्रेरणेने आजच्या काळात न जाणो एखादा शिवाजीसारखा लोक-गुणी इतर प्रांतात जन्माला येईल. कदाचित धर्माने तो मुसलमान ही असेल. शिवराय मुसलमान धर्माचे शत्रू नव्हते. मुस्लिमांच्या धर्म भावना न दुखावता ते मोघल निजाम आदिलशहाशी लढले. हा लढा धर्माधर्माचा नव्हता. जुलूम आणि स्वातंत्र्य यांच्यातला हा झगडा होता. शिवरायांच्या चरित्राचे हे आकलन केल्यास आजच्या स्थितीत मुस्लिमांना देखील शिवजयंती उत्सवात भाग घेण्याची दिक्कत वाटणार नाही.
आज आपण जातीपातीचे राजकारण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सुद्धा आपली मजल गेली. अफझलखानाच्या वध म्हणजे जणू काही एका हिंदूने एका मुसलमानाची निर्घुण हत्या केली असं समजून काही लोकांनी पोस्टर्स लावले आणि शिवरायांबद्दलचा गैरसमज पसरवण्यास अजून मदत केली. दारू ढोसायची, डिजिटल डॉल्बीवर आपल्या बापाचा रस्ता समजून नाचायचं. हे असले कसले शिवभक्त!!! अरे लाज वाटत असेल शिवबांना सुद्धा तुमच्याकडे पाहून. सह्याद्री प्रतिष्ठान आणि कितीतरी संघटना ज्यांनी दुर्गसवर्धनेच वसा हाती घेतला आणि कितीतरी किल्ल्यांना जीवदान दिलं. काही संघटना रक्तदान वगेरे शिबीर राबवतात. असं काहीतरी करा ना राव कशाला पाहिजे तू हिंदू मी मुस्लिम वाद!!


आणि रायगडचा राजा खऱ्या रुपात घरोघरी गेला..
छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आणि त्यासंबंधी लेख प्रसिद्ध करून श्री वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा जन्म पेण येथे १८९३ साली झाला. रेल्वेच्या ऑडीट खात्यात काम करत असताना ते भारत इतिहास संशोधन मंडळात काम करू लागले. श्री वा. सी. बेन्द्रेना लंडनला जाऊन इतिहासाची साधने तपासण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी परिस केलं. त्यापूर्वी इब्राहीम खान नावाच्या परकीयाचे चित्र शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून इतिहासांच्या पुस्तकात छापले होते. १९१९ मध्ये बेन्द्रेना अभ्यास करत असताना valentine या डच गव्हर्नरने लिहिलेलं एक पत्र मिळालं. इ.स. १६६३-१६६४ सुरतेच्या डच वखारीत तो गव्हर्नर होता. त्याचा आणि महाराजांच्या भेटी प्रसंगी काढलेले चित्र श्री बेंद्रे यांना मिळाले आणि तेव्हापासून रायगडचा राजा खऱ्या रुपात घरोघरी गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आणि त्यासंबंधी लेख प्रसिद्ध करून श्री वा. सी. बेन्द्रेनी अत्यंत महत्वाची कामगिरी केली. आज आपल्यापैकी किती जणांना हे माहित आहे. चला तर मग आज शिवजयंती निम्मित वासुदेव सीताराम बेंद्रे यांचे सुद्धा स्मरण करूया. इतिहास हा निव्वळ विषय नसून त्यातून खूप नवीन काही शिकून आपल्या रोजच्या जीवनात त्या implement करून आलेल्या संकटांवर मत करून जे हवं आहे ते मिळवणं. चला आवरतं घेतो आता लिहायला बसलं कि खूप लिहू शकतो.