Sunday, July 29, 2012

माणुसकी...

काल फार बोर होत होतं, याला दोन कारणं होती एक म्हणजे internet connetion बंद होतं तेच कारण bill pay न केल्यामुळे आणि वाचायला कोणतं नविन पुस्तकंही नव्हतं. मग म्हटलं एखादं जुनच पुस्तक वाचाव आणि हाती लागलं साने गुरुजींच 'श्यामची आई'. पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगायचे म्हटले तर छोट्या मुलांनी आणि ज्या आया आपल्या मुलांना मारतात त्यांच्यावर ओरडतात त्यांनी हे पुस्तक जरुर वाचावे.
असो श्यामची आईमध्ये एक कथा आहे मथुरिची. ही मथुरी म्हणजे श्यामच्या घरात काम करणारी बाई असते. एके दिवशी श्यामच्या आईला मथुरीच्या मुलाकरवी कळते की ती फार आजारी आहे. तेव्हा श्यामच्या आईने त्या मथुरिची घेतलेली काळजी याचे एकंदरीत वर्णन केले आहे. ही कथा वाचल्यानंतर मला छायाबाईंची आठवण झाली. आता ही छायाबाई कोण..? असाच विचार करताय ना? सांगतो.. अगदी सविस्तार. मी सातवी-आठवीत असेन तेव्हाची ही गोष्ट. ते पावसाळ्याचे दिवस होते. असाच एके दिवशी शाळा सुटल्यानंतर घरी आलो आणि पाहतो तर काय चक्क एक वेडी बाई अगदी दरवाज्याजवळ बसलेली. ती फार विचित्र दिसत होती. मळकटलेले कपडे, डोकं कापडाने झाकलेले, एक कसलेतरी गाठोडे तिच्याजवळ होते. पदराने तिचा चेहरा झाकला होता आणि ही बाई चक्क दाराजवळ बसली आहे. त्या वेड्या बाईला पाहताच क्षणी माझ्या तळ पायाची आग मस्तकाला गेली आणि मी तिच्यावर खेकसलो, ये चल उठ इथून, इथे नको बसू, चल चल पळ. माझा आवाज ऐकून ती बिचारी उठून चालायला लागली. तेवढ्यात घरातून आमच्या आउसाहेब बाहेर आल्या आणि त्या वेड्या बाईकड़े बघत म्हणाल्या, थांबा छायाबाई कुठेही जाऊ नका. मी फार गोंधळून गेलो.. काय छायाबाई .. तर या वेड्या बाईचे नाव छायाबाई आहे. बरं ते ठीक आहे पण हे आमच्या आऊसाहेबांना कसे कळले. आई मला आत घेउन गेली आणि सांगितले की आरे काही नाही थोडं उरलं आहे तेच तिला देत आहे एवढा कशाला वैताग करून घेतोस. मी म्हटलं तुला त्या बाईला काय द्यायाचय ते दे पण please तिला आपल्या घरापासून हकाल..
थोड्या वेळाने मी शांत झालो आणि tuitionला निघून गेलो. Tuitionहुन परत आल्यानंतर ती बाई अंगनात दिसली नाही. म्हटलं बरं झाला गेली एकदाची. थोड्या वेळाने जेवण उरकून हात धुवायला bathroom(हा आता आमचं त्या काळच bathroom म्हणजे एक लांब सड़क मोठी रूमच)मधे गेलो. हात धुताना मला अंधारात कोणीतरी बसल्यासारखे वाटले आणि मी घाबरून सरळ आईला सांगितले की तिकडे कोणीतरी चोर-बीर आहे. आईने मला शांत केले आणि सांगितले की तिकडे चोर वगेरे कोणी नाही तर ती छायाबाई आहे. हे ऐकून आईला म्हटलं तुझ नेमका काय चाललय. हा काय प्रकार आहे? तुला तिला मदत करायचीच असेल तर थोड़े फार पैसे दे आणि पाठव इथून. आउसाहेब म्हणाल्या आरे मीही तेच करणार होते पण बाहेर पाउस पडतोय आणि रात्रही झाली होती म्हणुन मीच तिला थांबवलं. आरे ती भरकटली आहे, आपण तिच्या घरच्यांचा शोध घेऊ आणि तिला पाठवुन देऊ. ती काय कायमची आपल्या घरी राहणार आहे का. आजची रात्र तिला इथे राहु दे उद्या सकाळी आपण काहीतरी बघू. मला आऊसाहेबांच पटलं पण आम्ही काय श्रीमंत वगेरे मुळीच नव्हतो हे असले समाज कार्य करायला.
ती बाई काय आमच्या घरातून काही गेली नाही. आई त्या बाईची फार काळजी घ्यायची. तिला आपल्या जून्या साड्या वगेरे दिल्या. हे सर्व बघताना मला असे वाटायचे की ही बाई कदाचित आमच्या आऊसाहेबांची लांबची बहिण वगेरे आहे किव्हा मैत्रिन वगेरे तर नक्की आहे. म्हणुन मी तिला घरातून हकालण्याचा नाद सोडला. छायाबाई हळु हळु परत माणसाळल्य़ा(खरच ती बाई चक्क वेडी होती). छायाबाई आमच्या आऊसाहेबांना प्रतेक कामात मदत करायच्या. भाजीपाला चीरने, धुणी भांडी करने, कोणतेही काम असो छायाबाई ते इतकं व्यवस्थित आणि स्वछ करायच्या की, असं वाटायच ही बाई नक्की चांगल्या घरातली आहे. ती खरच चांगल्याच घरातली होती. I mean आहे. आम्ही जेव्हा जेव्हा छायाबाईंना त्यांच्या घराबद्दल विचारायचो तेव्हा त्या फार काही सांगायच्या नाही. त्या म्हणायच्या की घरात माझी कोणालाच काळजी नाही माझ्या नवरयाला सुद्धा नाही. एकंदरीत त्यांच्या बोलन्यातुन असे वाटायचे की ह्या बाईला परत तिच्या घरी जायचे नाही. म्हणुन नंतर आम्ही त्यांना ह्या बाबतीत विचारण टाळलं.
जवळ जवळ ३-४ वर्षात छायाबाई एक family member झाल्या. आमच्या घरी शेजारच्या एका गावातून एक गवळीमामा दुध आणायचे. एके दिवशी त्यांनी छायाबाईला पाहिले. गवळी मामांनी आईला सांगितले की ही बाई आमच्या गावातल्या अमुक अमुक यांची बायको आहे. ह्या बाईला दोन मुलीही आहेत,घरची परिस्थिति पण चांगली आहे आणि ही बाई तुमच्या इथे काय करतीय. आईने घडला प्रकार गवळी मामांना सांगितला आणि छायाबाईला विचारले की हे जे काही सांगत आहेत ते सर्व काही खरं आहे. तेव्हा छायाबाईने खरे असल्याचे कबुल केले आणि परत घरी जाण्यास इंकार केला. एके दिवशी आईच्या सांगन्याने गवळी मामांनी छायाबाईच्या नवरयाला घरी घेउन आले. छायाबाइना त्यांच्या घरी जाण्यास convenience केलं आणि त्या दिवशी छायाबाई परत त्यांच्या घरी गेल्या.
मित्रांकडून मला कळले की छायाबाईंचे केस ख़राब झाल्याने आईने न्हावी कडून त्यांचे केस कापून घेतले होते. आईने छायाबाई वर केलेले हे सर्व उपकार पाहून माझे काही खोड़कर मित्र छायाबाईंना अमोलची मावशी म्हणायचे. मला फार वैताग यायचा. पण मनात मलाही हे कोठे तरी खरे वाटायचे. असो अधून मधून त्या आमच्या घरी यायच्या. त्यांचं आयुष्य सूखात जात असल्याचे पाहून आम्हा सर्वाना बरं वाटतं. आईने छायाबाईच आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलं याचा फार आभिमान वाटतो. कोणाची मदत करायची असेल तर तुम्ही फार मोठे श्रीमंत असण्याची गरज नसते हे तेव्हा अनुभवलो.