परवा मला कोणाला तरी कोणत्या तरी भाषेत काही तरी सांगायचं होतं. आता कोणाला आणि काय सांगायचं होतं हे तुम्हाला सांगायची मुळीच आवशकता नाहीये. हे अगदी personal आहे. मला माहित आहे तुम्ही मला personal मधलं personal सांगितलं असेल. असो हा मुद्दा फार काही महत्वाचा नाही. मला जे काही कोणाला सांगायचं होतं ते सांगून झालं.
परवा मला एका मराठी माहित नसलेल्या मित्राचा फोन आला म्हणे कि i like you so much असं एखाद्या मराठी मुलीला मराठीत कसं म्हणायचं. मी म्हटलं सोपं आहे. मराठी मुलींना इंग्लिश, हिंदी उत्तम येतं. तू इंग्लिश मध्येच सांग कळेल तिला फार काही विचार करू नको. पण त्याला वाटलं मी त्याची थट्टा करत आहे. मागेच लागला सांग सांग म्हणून. नंतर मी थोडा deep मध्ये जाऊन सांगितलं. म्हटलं हे बघ मराठी मुली मराठी पोरांना लवकर पटत नाहीत जितक्या सहजासहजी त्या non-मराठी पोरांना पटतात. हे मात्र बावलटाला लगेच कळले. Thanks अमोल म्हणून फोन कट केला नमुन्याने.
पुणे मुंबई सारख्या शहरात हीच परिस्थिती आहे. माझा काय या बाबतीत personal experience नाहीये.तुमच्या सारख्या मित्रांचे किस्से. नाचता येईना अंगण वाकडे. दुसरं काय?
No comments:
Post a Comment