Tuesday, July 6, 2010

आज तेव्हा हरवल्या सारखे वाटत आहे..

आज फारच बोर होत आहे, झोपही येत नाहीये. म्हणून माझी 1 बालपणाची गोष्ट शेर करावी वाटत आहे. मी 1ली ला होतो, लहानपणी आह्माला शाळेत सोडायला कोणीही येत नसे, शाळेत जाताना आझीची आठवण झाली आणि मी निघालो सोलापूर च्या दिशेने कारण आजी सोलापूरला राहायची. माहित होते कि सोलापूर या दिशेने आहे म्हणून पण हे नव्हते माहित के तो रस्ता फक्त आझीच्या घरी जात नाही. नळदुर्ग गेले अणदूर आले (4-5 किलोमितर). एका ठिकाणी बसून रडत असताना 2-3 लोक आले आणि त्यांना वाटले कि हा मुलगा अन्दुरचा आहे. त्यांनी मला पूर्ण अणदूर फिरवले लोकांना विचारत कि हा कोणाचा मुलगा आहे. शेवटी ते मला म्हणाले कि तुला आता आह्मी पोलिसात देतो. तेह्वा मात्र मी घाबरलो आणि मी त्यांना बोललो कि मला पोलिसाकडे देऊ नका. माझ्या वडिलांचे नळदुर्ग मह्ध्ये हॉटेल आहे आणि त्यांचे नाव पाटील आहे. आणि अणदूर च्या शाळेत नळदुर्ग ची खूप मुले शिकतात, तर रोडवर जात आसलेया 1का मुलाला त्यांनी विचारले व ते मला घेऊन आमच्या घरी आले. आणि इकडे माझी आई वेडी झाली होती, त्यांनी पूर्ण नळदुर्ग शोधले होते. आणि पप्पा आईला सांगायचे कि माझा मुलगा खूप हुशार आहे तो येईल कि नाही बग...

No comments:

Post a Comment