Friday, July 29, 2011

waste of time....

गेली चार पाच दिवस आजारी आहे. ताप सर्दी खोकला जणू काही माझे सोबतीच झाले आहेत. शनिवारी रात्री बाहेर खाल्ल्याचे कारण झाले. मग काय रात्रभर थंडी-ताप..! ती शनिवार ची रात्र मी कधीही विसरू शकणार नाही. खूप त्रास झाला होता. फक्त आईची आठवण येत होती. असे वाटत होते कि आज मी आईच्या जवळ असतो तर मला काहीच जाणवले नसते. सकाळी उठलो तर joints फार दुखत होते. डॉक्टर कडे गेलो injection ठोकले & १५-२० गोळ्या दिल्या. वाटले बरे होईल संध्याकाळ पर्यंत, पण आजाराने जणू ठरवले होते कि १ आठवडा तरी रहायचे. सोमवार उजाडला, बरे वाट न्हवते पण तरीही office ला पोहोचलो. पण क्षणभर ही बसावे वाटले नाही आणि निघून आलो घरी. दुसरा दिवस उजाडला कालच्या पेक्षा आज परिस्तिथी वाईट होती. डॉक्टर कडे गेलो, म्हणे कि दोन दिवसात बरे नाही झाले तर नायडू हॉस्पिटल मध्ये admit करावे लागेल. आता मात्र माझी फाटली. सुदैवाने ताप कमी झाला पण अशक्त पणा जाणवत होता. त्या दिवशी मनात १ विचार येऊन गेला, 'तुह्मी किती strong आहात हे बिकट परीस्तीथित सिद्ध होते'. या आजारामुळे माझा १ पूर्ण आठवडा वाया गेला ही सर्वात मोठी खंत. ते म्हणतात ना आलीया भोगासी असावे सादर... काय लिहणार या अश्या पळपुट्या आजाराबद्दल.
Date
4th July 2013
Extending this blog post as i'm suffering from same situation. I'm suffering from cold fever from last 3-4 days & got tested by 3 doctors. Saab sale BHMS.. Kuch change nahi hai.. only eating n sleeping now a days.. Hope i'll go office tomorrow.