Sunday, October 28, 2012

पुणे बस डे

बस डे बस डे बस डे! बस्स ..! झाले आता. आरे बाबांनो तुम्हाला या बसडे च्या माध्यमातून काय साध्य करायचे आहे ते तरी स्पष्ट करा. गेली 15-20 दिवस वाचतोय, या संघटनेने पाठिंबा दर्शविला, त्या संघटनेने पाठिंबा दिला. या फेडरेशनने एवढी मदत दिली त्या ग्रुपने इतके पैसे दिले. महिला बचत गट, मनपा कर्मचारी, वगेरे सांगितले की आम्ही 1 नोव्हेंबरला बसनेच प्रवास करू. अशा अनेक बातम्यांनी मला हा Blog Post लिहावयास भाग पडले.
मी काही नदीच्या काठी उभे राहून, पोहताही येत नसताना पोहन्याचे महत्व सांगणारा मी काही कोणत्या पक्ष्याचा नेता नाही की सकाळशी माझे काही वैर नाही. मी एक आपला साधा मराठी माणुस(माणुस कसला पोरगाच!) जो दररोज बसने प्रवास करतो. त्यापूर्वी बसनेच प्रवास करणारा विद्यार्थी होतो. त्यामुळे हे लिखाण द्वेशातुन वगेरे लिहिले नाही हे या ठिकाणी मला स्पष्ट करायचे आहे. सकाळच्या बस डे कार्यक्रमाविषयी माझ्या व माझ्यासारख्या बस प्रवाश्यांच्या मनात काही शंका आहेत ते मी या Blog Post च्या माध्यमातून लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
पहिला मुददा म्हणजे त्या लोकांनीच शहानपण सांगावे जी लोकं खरीच शहानी आहेत. आरे हे लोक ज्यांच्या बाप-जाद्यानी कधी बसने प्रवास केला नाही एवढेच काय तर यांच्या ऑफिसमधल्या peon ने सुद्धा बसने कधी प्रवास केला नसेल. मला सांगा या लोकांना हक्क आहे का 1 नोवेंबरला बसने प्रवास करण्याचा उपदेश देण्याचा. म्हणे काय तर We are contributing to the Pune bus day by motivating people to travel by bus. आणि साल्या तू आलिशान कार घेउन ऑफिसला जाणार, तुझा पोरगा 1000 CC ची बाइक घेउन FC, MG रोडवर फिरणार. फिरा रे बाबांनो अगदी मनसोक्त फिरा तो तुमचा हक्क आहे. पण बसने प्रवास करण्याचा उपदेश देण्याचा हक्क मात्र तुह्माला नक्कीच नाहीये. पुणे बार एसोसिएशनने पण जाहिर केले की आह्मी वकील 1 नोव्हेंबरला बसनेच प्रवास करू, अहो वकीलसाहेब तुह्मी बसने प्रवास तर करणार नाहीच पण तुमच्या एखाद्या अशिलाला बसने थोडा उशीर झाला तर तुमची मनंस्थिती कशी होते हे काही मी फारसं सांगायला नको. जाऊ दे रे..नको त्या फंदात पडायला नाहीतर एखादी केस करतील आणि बसायला लागेल मला खड़े फोडायला. माझे आजोबा मला नेहमी सांगायचे जो माणुस कोर्ट-कचेरीच्या कचाट्यात आडकला तो संपला. याउलट आपल्या लाडक्या सचिनने काय सही प्रतिक्रिया दिली. त्याने लोकांना काही उपदेश दिला नाही त्याने फ़क्त इतकेच सांगितले "भारतातील बहुतेक शहरांत वाहतुकीची समस्या गंभीर होत असताना पुण्यात एक नोव्हेंबर हा पुणे बस डे म्हणून साजरा होत असल्याचे मला जास्त कौतुक वाटत आहे". माझा एक मित्र आहे तो Persistent मध्ये कामाला आहे त्याचा पगार 45,000 रुपये आणि तो रोज ऑफिसला चक्क बसने जातो-येतो. अशा लोकांची प्रतिक्रिया फार महत्वाची आहे. या माझ्या मित्राकडे बघून मला बाइक न घेता बसने प्रवास करण्याची प्रेरणा मिळाली.
आता मी दुसरया मुद्याकडे वळतो. खरचं PMPML ला मदतीची गरज आहे का?? तिकिटाचे दर बघून मला नाही वाटत PMPML तोट्यात जात असेल आणि खरचं तोट्यात जात असेल तर त्याला सर्वस्वी PMPML शी related नेतेमंडळी आणि अधिकारी आहेत. माट जर खालून गळत असेल तर वरून कितीही पानी ओतले तर ते रिकामेच होणार. हे मलाच काय 3-4 वर्षाच्या मुलालाही कळते. डिजेलपासून सीटच्या कुशनपर्यंत भ्रष्टाचार चालतो. मला इतकच सांगायचय की तुह्मी यांना मदत करताय.. माझी काहीच हरकत नाही उलट मला आनंदच होत आहे पण PMPML मधला सावळा गोंधळ उघडकीस आणायचे काम पण तुम्ही चोख बजावले पाहिजे. हो की नाही????
तुह्माला काय वाटते असे आव्हान केल्याने लोक बसने प्रवास करतील. लोकांना Global Warming, Pollution चे कितीही डोस पाजले तरी ते ऐकून गाडीला किक मारूनच कामाला जाणार. त्या पेक्षा PMPML सुधारा चांगली सेवा दया लोकांना आणि खरच जर बसची सेवा चांगली मिळाली ना तर नक्की लोक बसने प्रवास करतील. कोणालाही हौस नाही आली कि एवढे महाग पेट्रोल भरून स्वताची गाडी फिरवायची. 2० % लोक आहेत माजलेले ते उडवतात पैसे. पण ८० % लोक नक्की बसने प्रवास करतील. असो मला काय वाटते ते मी लिहिले. 1 नोव्हेंबरसाठी सकाळला माझ्या हार्दिक शुभेच्छा. मी तुमच्या या उपक्रमात अगदी मनापासून सामिल आहे. बघा जमलं तर 1 नोव्हेंबरला बसनेच प्रवास करा. एक दिवस तरी बघा किती problems ना face करतात बसचे प्रवासी ...

Sunday, October 21, 2012

मुन्ना-सर्किट on Late Mark

मुन्ना : ये सर्किट आज आपुन का दिमाग सटकेला है.
सर्किट : भाई क्या हुआ किसने मूड ख़राब किया? साले का नाम बोलो अभी जाके ६ के ६ डाल देता हु.
मुन्ना : ये साले सर्किट तू कब सुधरे गा रे. हर बात पे तू ६ के ६ उतारने की बात करता है..? आज पिने का मन कर रहा है सर्किट?
सर्किट : भाई तुमने आज तक कभी शराब को हाथ नहीं लगाया..?
मुन्ना : ये सर्किट आज पिने का मन कर रहा है? पिला ना रे?
सर्किट : भाई आखिर बात क्या है? हुआ क्या??
मुन्ना : सर्किट तुजे तो पता है आपुन अस्पताल जाने के लिए घर से बराबर टाइम पे निकलता है, साला आपुन तो बससे अस्पताल जाता है तो जाहिर है आपुन थोडा लेट पहुचेगा। तो अस्पताल वालो ने आपुनका लेट मार्क लगाया और पैसेभी काट लिए.
सर्किट : तो भाई आप अपनी गड्डी से क्यों नहीं जाते?
मुन्ना : आरे सर्किट तू तो मामू है, सोच अगर हर कोई ऑफिस जाने के लिए अपने अपने प्राइवेट वेहिकल इस्तमाल करेगा तो तू बोल ट्राफ़िक की तो माँ बेहन.. सॉरी यार वाट लगेगी के नहीं?
सर्किट : भाई ट्राफिक की लगती है तो लगने दो आपुन को क्या करने का? आपुन टाइम पे पंहुचा ना बस!
मुन्ना : अबे सर्किट तू अब दिमाग की दही बनारेला है. मानले जो लोग ऑफिस आने-जाने के लिए पब्लिक ट्रांसपोर्ट मतलब लोकल ट्रेन, बसेस का इस्तमाल करते है वो सब लोग अगर खुद की वेहिकल से आने-जाने लगे तो सोच रोड पे कितनी भीड़ होगी. सोच सकता है तू?
सर्किट : वो तेरी..! भाई में तो..मतलब... पुरे सिटी की वाट लगेगी। भाई अपुन जब गाड़ी चलाते है तो बसवाले के बारे में कभी नहीं सोचते.
मुन्ना : वहीच तो बोल रहा है आपुन? और साला सोच एसे सिटी में अपुन ठीक से सास भी नहीं ले पाएंगे। आज कल गड्डी खरीद ने के लिए किसके पास पैसे नहीं? चुटकी भर में लोन पास होता है. एक सिंपल सी बात है जो लोग लेट आते है उनको लेट छोड़ने का पर पैसे नहीं काटने का रे.. और रही बात अपुन की तो अपुन क्या 1-2 घंटा लेट नहीं होता.. बस 10-15 मिनट का फासला होता है.
सर्किट : भाई बराबर बोला पर ऑफिस के भी कुछ रूल्स होते है ना भाई.
मुन्ना : सर्किट रूल्स तोड़ने की कौन बात करता है। पर 10-15 मिनट के बाद लेट मार्क लगाना गलत बात है। इन लोगो को ऑफिस टाइम के अन्दर कोई अपने बॉयफ्रेंड या गर्ल-फ्रेंड के साथ चैटिंग या फिर कैंटीन में बैठकर टाइम पास करता है तो वो चलता है। छोड़ ना यार अपुन को क्या करने का है क्योन क्या करता है.
सर्किट : भाई में तो बोलता हु जो लोग अपने ऑफिस को पब्लिक ट्रांसपोर्ट से आते है उनके लिए ये लेट मार्क का रूल थोडा अलग करना चाहिए.
मुन्ना : ये हुई न बात सर्किट. ज़िन्दगी में तुमने दूसरी बार कुछ सही बोला है.
सर्किट : और भाई पेहली बार?
मुन्ना : LOL...
सर्किट : भाई कितना पैसा काट लिया?
मुन्ना : चल छोड़ ना रे सर्किट. कोण कम्बक्त पैसा कमाने के लिए काम करता है. हम तो काम करते है ताकि कुछ सिख सके. चल आज तू पिलाएगा अपुन की आज-कल कड़की है।