सगळ्यात मोठे काम रात्री मंडळात झोपायला जाण्याचे असायचे. घरी त्यासाठी पार रामायण-महाभारत व्हायचे. पण शेवटी आई सोडायची कारण शाळेचा आणि क्लासचा अभ्यास केलेला असायचा आणि मी तर फार हट्टी होतो. एकदा घरातून अंथरून-पांघरून घेऊन निघालो कि जग जिंकल्यासारखे वाटायचे. ते १०-१२ दिवस कसे निघून जायचे ते कधीच कळले नाही आणि आताही कळत नाही. विसर्जनाच्या दिवशी तर विचारू नका काय काय करायचो. चारचाकी गाडा १०-२० रुपये देऊन मिळायचा आणि त्या गाड्यातून आह्मी श्री ची मूर्ती ठेऊन विसर्जनाला घेऊन जायचो. जाताना मस्त वाजत गाजत नाचत जायचो. शेजारी आमच्या सारखेच छोटे मंडळ असायचे, त्यांच्या पेक्षा उत्तम करण्याचा आमचा सारखा प्रयत्न असायचा. आज तेच छोटेसे मंडळ इतके मोठे झाले आहे कि त्यासमोर मी लहान आहे. घोषणा देऊन देऊन घसा बसायचा. खूप मजा केली आहे & all credit goes to my friends.
अंजनी प्रशालेत तर असताना गणेश उत्सवाचा आनंद व्दीगुणीत व्हायचा. शाळेत श्री ची स्थापना व्हायची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उस्तवात व्याखानमालेचा कार्यक्रम असायचा. खूप मोठे मोठे वक्ते यायचे त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळायचे. आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्द स्वागत करायला मिळाले तर खूप गर्व वाटायचा. माझ्या आयुष्यात मला सर्वात आवडलेला उपक्रम. आलेल्या वक्त्याकडे पाहून वाटायचे मी पण मोठा झाल्यावर असेच शाळा मला आमंत्रित करेल आणि तो दिवस नक्की येणार याचा मला आत्मविश्वास होता आहे आणि असणार. विसर्जनाच्या दिवशी तर लेझीम पथकात सहभाग असायचा. विसर्जानंतर मुळे बाईंच्या घरी वरण भात मिळायचा त्याची चवतर सहीच. पण एक प्रोब्लेम व्हायचा शाळेत गणपती असल्यामुळे मंडळात जाण्यास जास्त वेळ मिळायचा नाही.
अजून एक आठवण मी कधीही विसरू शकणार नाही आणि ती म्हणजे शिवशाही तरुण मंडळाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत केलेली partiality. Basically माझा पहिला नंबर आला होता पण त्यांनी त्यांच्या गल्लीतल्या दोघांचा पहिला व दुसरा आणि माझा तिसरा नंबर काढला. हे मला त्या दोघांची नावे ऐकल्यावर लक्षात आले आणि मी मोरखंडीकर सरांना सांगितले कि स्टेजवर गेल्यावर मी लोकांना सांगणार आहे कि यांनी partiality केली आहे आणि मला हे बशीस नकोय. सरांनी माझी समजूत काढली आणि मी शांत झालो. अश्या खूप आठवणी आहेत, मी लिहित बसलो तर तुह्मी वाचत वाचत बोर व्हाल. गणपती बाप्पा मोरया...मंगल मूर्ती मोरया..